श्री. माधवराव निवृत्ती काळभोर (मदनभाऊ) हे सातारा जिल्हा परिषद आणि कराड पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी पाल जिल्हीचे अधिकृत उमेदवार आहेत. ते जनतेच्या सेवेसाठी व प्रगतीसाठी समर्पित असून त्यांच्या मजबूत नेतृत्वाखाली भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा संकल्प आहे.
आपल्या भागाच्या विकासाची गाडी याच वेगाने पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे.
संकल्प प्रगतीचा.. पाल जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाचा..!
सबका साथ.. सबका विकास.. सबका विश्वास..!
आपल्या बराचसा भाग पाण्यापासून वंचित असून जिल्हा परिषद गटातील व गणातील अशाही सर्व गावांमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी व शेतीसाठी तब्बल पाणी उपलब्ध होईल असे करणे हे आमचे प्रमुख लक्ष आहे.
जिल्हा परिषद गट व गणातील सर्व गावांमध्ये संपर्क क्षमता असून अशाही बरीच गावे पक्क्या रस्त्यांपासून वंचित आहेत. याकरिता रस्त्यांचे जाळे विकसित करून दळणवळण व्यवस्था वाढविण्याचा आम्ही संकल्प केला आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून घरगुती वापरासाठी व उद्योगांद्वारे तसेच शेतीसाठी पुरेशी वीज उपलब्ध असली तरी संपूर्ण व्यवस्था पारंपरिक ऊर्जास्रोतांवरती अवलंबून आहे. त्याकरिता या व्यवस्थेत अपारंपरिक (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा इ.) स्रोत जोडणे हे आमचे उद्दिष्ट असेल.
प्रामुख्याने शेतीवरती अवलंबून असणारा हा आपला भाग असून यातील युवकांसाठी शेतीपुरक उद्योग जोडणे व महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.
स्वतःच्या वैयक्तिक व सामाजिक आरोग्यास प्राधान्य देणे हे आपले कार्य असून त्याकरिता गावोगावी आरोग्य सेवा उभारून त्याचा लाभ सर्वांना मिळवून देणे तसेच सातत्याने आरोग्य शिबिरे राबवून सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे परम कर्तव्य आहे.
आपल्या भागात बरीच नैसर्गिक विविधता असून प्राचीन धार्मिक स्थळेही आपल्या भागात आहेत परंतु या सर्वांचा म्हणावा तसा विकास झालेला नसून पर्यटन वाढीसाठी व यातून रोजगार निर्मिती तसेच सक्षम अर्थकारण याकरीता या सर्वस्थळांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होणे महत्त्वाचे असल्याने तो करण्याचा संकल्पही आम्ही केला आहे.
आपल्या जिल्हा परिषद गटातील शाळांचा दर्जा उंचावून अत्याधुनिकेतून दर्जेदार शिक्षण सर्वांना मिळावे हा आमचा मुख्य संकल्प आहेरण्याचा संकल्पही आम्ही केला आहे.
याव्यतिरिक्त केंद्र शासनाच्या माध्यमातून अंत्योदय सुरक्षा योजनेअंतर्गत जिणारे तोफत रेशनिंग धान्य, राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना यासारख्या योजना आपणापर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून देणे तसेच तरुण युवक, महिला व वृद्ध नागरिक यांना शासनाच्या इतर सर्व योजनांचा लाभ देणे हे आमचे आद्य कर्तव्य असून त्याकरिता आम्हाला आपल्या मत रूपी आशीर्वादाची गरज आहे.
दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कमळ चिन्हावरील बटन दाबून द्याल याची आम्हाला खात्री आहे. आपले मत वाया जाणार नाही याचा विश्वास या संकल्पपत्राद्वारे आम्ही आपणास देत आहोत.
निवडणूक प्रचार मोहिमेतील अलीकडील कार्यक्रम, सभा आणि संपर्क अभियानांची माहिती.
निवडणूक प्रचाराचे कार्यक्रम आणि सभा लवकरच जाहीर केल्या जातील.