सातारा जिल्हा परिषद / कराड पंचायत समिती निवडणूक २०२६
"संकल्प प्रगतीचा.. पाल जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाचा..!"
"संकल्प प्रगतीचा.. पाल जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाचा..!"
"सबका साथ.. सबका विकास.. सबका विश्वास..!"
उमेदवारांची विकास योजना व तपशील
५४-पाल जि. प. गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेेदवार
१०७-पाल पं. स. गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेेदवार
१०८-चरेगाव पं. स. गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार
"संकल्प प्रगतीचा.. पाल जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाचा..! सबका साथ.. सबका विकास.. सबका विश्वास..!"
पाल जि. प. गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना सहृदय सप्रेम नमस्कार,
आपण सर्वांना ज्ञात आहेच सध्या सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती २०२६ ची निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीच्या वाटाघाटीतली सर्वात राष्ट्रीय महत्त्वाचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून कराड उ. चे आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आपणा सर्वांच्या साथीने या निवडणुकीला सामोरे जात आहोत.
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाच्या विकासाचा संपूर्ण देशभर डंका वाजत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे ध्येय सोडून न गेली दशकभर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करीत आहेत. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकारीभारी महाराष्ट्र राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जात आहेत व विविध प्रभावी योजना राज्यभर राबवत आहेत.
अशा परिस्थितीत आपल्या जिल्हा परिषद गटाची व गटाची सत्ता स्थानीय एकच पक्ष केंद्रित व व्यवस्थित केंद्रित झाल्यामुळे ज्या पद्धतीने या भागाचा विकास व्हायला हवा होता त्यापद्धतीने झालेला नाही याची खंत वाटते. म्हणूनच हा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठीच एक संघ म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत.
जशी आपल्या भागाची स्थिती आहे तशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी आपल्या कराड उ. विधानसभा मतदारसंघाची होती. कराड उ. मतदारसंघात परिवर्तन झाल्यानंतर आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे यांनी विकासाचा झेंडा उभारून आपल्या जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमधील विविध विकास कार्यांसाठी कोटी रुपये जमा देऊन या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प केला आहे.
पाल जि. प. गटाचे व पाल पंचायत समिती तसेच चरेगाव पंचायत समिती गटाचे प्रतिनिधी म्हणून आम्हीही विकासाचा संकल्प सोडून न या निवडणुकीला सामोरे जात आहोत. कराड उ. विधानसभा मतदारसंघाची अवस्था तशी एक बाजूला सुंदर सफूल व दुसऱ्या बाजूला तीव्र दुष्काळ अशी. त्याप्रमाणेच आपल्या जि. प. गटाची ही अवस्था आहे. ही परिस्थिती पूर्णपणे बदलण्यासाठी आम्ही विकासाची षट्सूत्री आम्ही तयार केली आहे.
याव्यतिरिक्त केंद्र शासनाच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजने अंतर्गत मिळणारे मोफत रेशनिंग धान्य, राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना यासारख्या योजना आपणापर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून देणे तसेच तरुण युवक, महिला व वृद्ध नागरिक यांना शासनाच्या इतर सर्व योजनांचा लाभ देणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. त्याकरिता आम्हाला आपल्या मत रुपी आशीर्वादाची गरज आहे. आपण सर्वांनी निश्चितपणे मत रुपी आशीर्वाद दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जि. प. व पं. स. समिती निवडणुकीत कमळ चिन्हावरील बटण दाबून द्याल याची आम्हाला खात्री आहे. आपले मत वाया जाणार नाही याचा विश्वास या संकल्प पत्राद्वारे आम्ही आपणास देत आहोत.
धन्यवाद,..!
आपलेपणाने आपले जि. प. गट व पं. स. गटाचे भविष्यातील आपले सेवक:
उमेदवारांच्या संपूर्ण योजना व विकासाचे तपशील डाउनलोड करा
दोन्ही फाईल्स डाउनलोड करा व उमेदवारांच्या योजना जाणून घ्या